काँग्रेसला सर्वात मोठा झटका ! बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
काँग्रेसला सर्वात मोठा झटका ! बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
img
Nandini khandare More

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर सध्या रुजतील राजकरणात मोठी उलथापालथ होत आहे. दरम्यान आता कोंग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.  सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तेथील महत्त्वाच्या नेत्यांना काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. 

या नेत्याचा हा पक्षप्रवेश म्हणजे सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.  सोलापूर काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला आहे. रमेश हसापुरे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठे नेते आहेत. रमेश हसापुरे यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवलेली आहे. मागील अनेक वर्षापासून ते काँग्रेसमध्ये विविध पदावर कार्यरत होते. 

मात्र आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे दक्षिण सोलापुरातील काँग्रेस संघटनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आता रमेश हसापुरे यांची पोकळी कशी भरून निघणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group