मोठी बातमी !  डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला हादरवणारी धमकी, जगात मोठी खळबळ
मोठी बातमी ! डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला हादरवणारी धमकी, जगात मोठी खळबळ
img
Nandini khandare More


अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र तरी देखील अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिकेच्या 21 सैन्य तळांवर हल्ला केल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. दरम्यान त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आता अधिक आक्रमक बनले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा इराणला हादरवणारी धमकी दिली आहे. इराण युद्धविरामासाठी खूप विलंब करत आहे, त्यामुळे आता त्यांना याची किंमत चुकवावी लागेल. असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात सोशल मिडिया साईट ट्रूथवर पोस्ट केली आहे. या युद्धात इराणचं वायुदल, नौदल पूर्णपणे नष्ट झालेलं आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.


इराणचं सैन्यदल पूर्णपणे नष्ट झाले आहे. इराणकडे आता वायुदल, नौदल अशा कोणत्याही गोष्टी शिल्लक नाहीयेत. इराण पूर्णपणे हारलं आहे. इराण फक्त बोलत आहे, मात्र ते प्रत्यक्षात कारवाई करत नाहीत. मध्य पूर्वेतील इराणची दादागिरी आता पूर्णपणे संपुष्टात आली आहेत. मात्र तरी देखील इराण अमेरिकेसोबत अणु करार करण्यासाठी खूप वेळ लावत आहे, त्यांना याची किंमत मोजावी लागेल, अशी थेट धमकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आता इराणला देण्यात आली आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय करणार? याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान इराणच्या रिवोल्यूशनरी गार्डस् (IRGC) कडून पुन्हा एकदा अमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या 21 सैन्य तळांवर हल्ले केल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकेच्या जॉर्डनमध्ये असलेल्या सैन्य तळांचा देखील समावेश आहे. इराणकडून अमेरिकेच्या सैन्य तळांवर मिसाईल आणि ड्रोन हल्ला करण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group