''या'' तारखेपासून आधारकार्ड बाबत बदलतोय ''हा'' महत्वाचा नियम ! जाणून घ्या काय आहे ?
''या'' तारखेपासून आधारकार्ड बाबत बदलतोय ''हा'' महत्वाचा नियम ! जाणून घ्या काय आहे ?
img
Nandini khandare More

आधारकार्ड हा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज असून वेळोवेळी त्यामध्ये आवश्यक ते बदल केले जातात. दरम्यान, आता १ जुलै पासून आणखी एक महत्वाचा बदल होणार आहे. तुमच्या आधार कार्डमध्ये ईमेल आयडी लिंक नसेल किंवा तुम्हाला जुना ईमेल आयडी बदलायचा असेल. तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. UIDAI ने आधारमध्ये Email ID जोडणे आणि अपडेट करण्यावर लागणारं शुल्क अस्थायीरित्या संपवण्याचा निर्णय घेतलाय. आता 1 जुलै 2026 पासून पुढील 6 महिन्यापर्यंत ही सुविधा पू्र्णपणे मोफत मिळेल.

आता द्यावे लागणार नाहीत 75 रुपये : सध्या आधारमध्ये Email ID अपडेट करण्यासाठी 75 रुपयांचं शुल्क द्यावं लागत होतं. पण UIDAI चे नवीन नियम लागू झाल्यानंतर यूझर्सला ही फीस द्यावी लागणार नाही. म्हणजेच निर्धारित कालावधी दरम्यान ईमेल जोडणे किंवा बदलण्याचं काम कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय केलं जाऊ शकेल.

UIDAI ने का घेतला हा निर्णय? : देशात वेगाने वाढत असलेल्या डिजिटल सेवांना लक्षात ठेवत UIDAI जास्तीत जास्त लोकांना आधारशी ईमेल आयडी जोडण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छिते. ईमेल लिंक झाल्याने ओटीपी व्हेरिफिकेशन आणि आधारशी संबंधित ऑनलाइन सेवांचा वापर जास्त सोपा आणि सुविधाजनक होतो.

कधी मिळेल मोफत अपडटेची सुविधा? : UIDAI नुसार आधारमध्ये Email ID अपडेट किंवा जोडण्याची मोफत सुविधा 1 जुलै 2026 पासून सुरू होईल. ही विशेष सूट सुरुवाती 6 महिन्यांसाठी लागू राहील. म्हणजेच डिसेंबर 2026 पर्यंत यूझर्स कोणत्याही शुल्काशिवाय आपला Email ID अपडेट करू शकतील. 


या नवीन सुविधेची सर्वात खास गोष्ट म्हणजे, लोकांना वारंवार आधार सेवा केंद्रावर जाण्याची गरज पडणार नाही. UIDAI आपल्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून ईमेल अपडटे करण्याची सुविधा उपलब्ध करुन देईल. ज्यामुळे पूर्ण प्रोसेस पहिल्याच्या तुलनेत जास्त सोपी आणि वेगवान होईल.मोबाईल अॅपच्या मदतीने यूझर्स आपल्या स्मार्टफोनने आधारमध्ये ईमेल आयडी जोडणे किंवा बदलण्याची प्रोसेस पूर्ण करू शकाल. यामुळे वेळेची बचत होईल आणि आधार अपडेट करण्याची प्रॅोसेस जास्त सुविधाजनक होईल.

आधारशी ईमेल आयडी लिंक असल्यावक अनेक फायदे मिळतात. ओटीपी आधारित व्हेरिफिकेशन सोपं होतं. आधारशी संपंधित अपडेट थेट ईमेलवर मिळतात आणि ऑनलाइन सरकारी सेवांपर्यंत पोहोचणं सोपं होतं. यासह मोबाईल नंबर बदलल्याच्या स्थितीत ईमेल एक अतिरिक्त सुरक्षा ऑप्शन म्हणून काम करू शकतो.

 तुमच्या आधार कार्डमध्ये अजुनही ईमेल आयडी लिंक नसेल किंवा जुना ईमेल आता वापरला जात नसेल. तर 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या या सुविधेचा लाभ घेणं फायदेशीर ठरेल. यामुळे फक्त 75 रुपयांचीच बचत होणार नाही. तर तुमचा आधार रेकॉर्डही अपडेट आणि सुरक्षित राहील.


इतर बातम्या
Join Whatsapp Group