पुण्यातील भोर तालुक्यामधील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. आरोपी भीमराव कांबळे याने चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली.दरम्यान अखेर या प्रकरणातील निकाल पुढे आला आहे .
कोर्टाने आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने फाशची शिक्षा जाहीर केली आहे. दोन्ही बाजूचा निकाल कोर्टाने एकून घेतला, असल्याचे न्यायालयाने म्हटले. यादरम्यान न्यायाधीशांनी घटनांचा दाखला दिला. घटना किती जास्त क्रूर आहे, हे समजून घ्यावे, लागेल असेल न्यायाधिशांनी सुनावणीदरम्यान म्हटले. यादरम्यान कोर्टाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त बघायला मिळत आहे.
आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी चिमुकलीच्या कुटुंबियांनी केली. कोर्टात चिमुकलीचे आई वडील उपस्थित आहेत. आरोपी भीमराव कांबळे याला मृत्यूदंड की, जन्मठेप सुनावणार यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती, अखेर कोर्टाने नुकताच याबाबत निकाल दिला आहे. आरोपीने आपला गुन्हा देखील मान्य केला.
दोन्ही बाजूंचे निकाल ऐकून घेतल्यानंतर कोर्ट शिक्षेपर्यंत पोहोचत असल्याचे न्यायाधिशांनी म्हटले. या प्रकरणानंतर राज्यभरात मोर्चे निघाले, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात होती. कुटुंबियांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यातील अनेक बडे नेते चिमुकलीच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचले होते. केसच्या सुनावणीदरम्यान कोर्टाकडून अनेक केसचे दाखल देण्यात आली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना फाशीचा शिक्षा झाल्याचे कोर्टाने नमूद केले. आरोपी विरोधात सबळ पुरावे असल्याचे कोर्टाने नमूद केले.