आजपासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. एलपीजी गॅसच्या किमती, रेल्वे नियम, HSRP नंबर प्लेट, पासपोर्ट, आयकर रिटर्न (ITR), बँकिंग सेवा आणि क्रेडिट कार्ड सुविधांसह अनेक क्षेत्रांतील अपडेट्स जाणून घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. तुमच्यावर परिणाम करणारे हे 11 महत्त्वाचे बदल एकाच ठिकाणी पाहा.
1. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 183 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
2. रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आता 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.
3. HSRPनसलेल्या वाहनांवर आजपासून दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे.
4. टाटा मोटर्सने पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे.
5. काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत.
6. नव्या पासपोर्टसाठी 2,500 रुपये, तर तात्काळ पासपोर्टसाठी 5,000 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
7. आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून त्यानंतर विलंब शुल्क लागू होणार आहे.
8. आधार कार्डवरील ई-मेल अपडेटची सुविधा पुढील सहा महिन्यांसाठी मोफत उपलब्ध राहणार आहे.
9. स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स कार्यक्रमात बदल करण्यात आले आहेत.
10. HDFC बँकेच्या निवडक क्रेडिट कार्डधारकांना प्रत्येक तिमाहीत 3 मोफत देशांतर्गत विमानतळ लाउंज सुविधा मिळणार आहे.
11. ग्राहकांच्या नकळत विमा किंवा आर्थिक उत्पादने विक्री करणाऱ्या संस्थांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असून ग्राहकांना पूर्ण परताव्याची तरतूद करण्यात आली आहे.