सुप्रिया सुळेंच्या आवाजाला विश्रांती !  डॉक्टरांच्या सल्ल्यामागचं कारण काय ?
सुप्रिया सुळेंच्या आवाजाला विश्रांती ! डॉक्टरांच्या सल्ल्यामागचं कारण काय ?
img
Nandini khandare More

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. घशात सूज आल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आवाजाला पूर्ण विश्रांती देण्याचा सल्ला दिला असून, त्यामुळे त्या पुढील काही काळ सार्वजनिक भाषणे आणि माध्यमांशी संवाद टाळणार आहेत. याबाबतची माहिती सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. त्यांनी सांगितले की, घसा आणि आवाजाच्या तपासणीसाठी त्यांनी कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. मिलिंद किर्तणे यांची भेट घेतली. तपासणीनंतर घशात सूज असल्याचे निदान झाल्याने डॉक्टरांनी आवाजाला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

येत्या 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घशाचा त्रास सुरू झाल्याने पक्षाची भूमिका मांडण्याची मुख्य जबाबदारी आता दुसऱ्यांवर येऊ शकते. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्या म्हणतात की, "माझ्या घशाच्या आणि आवाजाच्या समस्येबाबत मी नुकतीच डॉ. मिलिंद कीर्तने यांची भेट घेतली. त्यांनी माझ्या घशात थोडी सूज असल्याचे निदान केले असून, मला पूर्णपणे 'व्हॉइस रेस्ट' (आवाजाला पूर्ण विश्रांती) घेण्याचा सल्ला दिला आहे. यावर उपाय म्हणून मी 'व्हॉइस थेरपी' घेणार आहे आणि पुढील 1-2 आठवडे भाषणे, मुलाखती व दीर्घकाळ बोलणे टाळण्याचा सल्ला मला देण्यात आला आहे. आपण ही परिस्थिती समजून घेतल्याबद्दल धन्यवाद."

इतर बातम्या
Join Whatsapp Group