मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मोठी संधी? थेट ''या''समितीत होणार एन्ट्री ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मोठी संधी? थेट ''या''समितीत होणार एन्ट्री ?
img
Nandini khandare More
राजकारणातील घामोडींना वेग आला असून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत एक मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता  वर्तवण्यात येत असल्याची अपडेट समोर येत आहे. भाजपच्या सर्वात ताकदवर मानल्या जाणाऱ्या 'केंद्रीय संसदीय बोर्डावर' फडणवीस यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांच्या दिल्लीतील वाऱ्या अचानक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय निर्णय मानला जात आहे.

महाराष्ट्रातील यशाचा राष्ट्रीय पातळीवर परिणाम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत झालेल्या सलग निवडणुकांमध्ये पक्षाला मिळवून दिलेल्या घवघवीत यशामुळे देवेंद्र फडणवीस यांचे भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वातील स्थान आणि महत्त्व कमालीचे वाढले आहे. सध्या ते भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे  सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

राष्ट्रीय पातळीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी करणे आणि निवडणुकांची अचूक रणनीती आखणे, ही फडणवीस यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. त्यातच त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही (RSS) पूर्ण पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या सर्व घडामोडींमुळेच आता पक्षाच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या केंद्रीय संसदीय मंडळात त्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस सध्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक आणि निवडणूक रणनीतीचा अनुभव ही फडणवीसांची जमेची बाजू असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. फडणवीसांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून फडणवीसांच्या दिल्लीतील वाऱ्या वाढल्याचंही सांगितलं जातंय..
इतर बातम्या
Join Whatsapp Group