परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीचालकांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा ! मराठी शिकण्यासाठी दिली ''इतकी'' मुदत
परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीचालकांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा ! मराठी शिकण्यासाठी दिली ''इतकी'' मुदत
img
Nandini khandare More

गेल्या अनेक दिवसांपासून  परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून वाद सुरु आहे . ज्या चालकांना मराठी येत नाही त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांनीदेखील या सक्ती विरोधात संप पुकारला होता. दम्यान हा वाद सतत सुरूच असून आता मात्र स्वतः मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी आता परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीचालकांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा  दिला आहे. 

समोर आलेल्या अपडेटनुसार , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी शिकण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. जर मराठी बोलता आली नाही तर थेट बॅज रद्द करण्याचा इशारा दिला होता. यावरून रिक्षा चालकांच्या परप्रांतीय वर्गाने संप देखील पुकारला होता. यानंतर मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये वाद देखील झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच या संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट त्यांना निवेदन देत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती.

आज मुंबईतल्या ऑटो रिक्षा चालकाच्या संघटनांनी माझी भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितलं की राज्यात जुजबी मराठी आली पाहिजे. याला आमचं समर्थन आहे. आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि कशाप्रकारे आम्ही शिकतोय हे त्यांनी दाखवलं. त्यांनी माझ्याकडं वेळ मागितली असून आम्ही मराठी शिकत राहू असे ते म्हणाले. त्यांनी एक वर्षांची मुदतवाढ मागितली असून मी आज निर्णय घेतला की त्यांना एक वर्षांची मुदत देण्यात येईल. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच संघटनेनं सांगितलं की वेगवेगळे क्लासेस घेऊन आणि मराठी लिटरेचरच्या माध्यमातून आम्ही मराठी शिकण्याचा प्रयत्न करू. जर ते स्वतःहून पुढे येत असेल तर त्यांना वेळ देणं गरजेचं होतं असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group