मनोज जरांगेंचा वैद्यकीय तपासणीला नकार; उपोषणाचा आज चौथा दिवस, नेमकं काय घडतंय ?
मनोज जरांगेंचा वैद्यकीय तपासणीला नकार; उपोषणाचा आज चौथा दिवस, नेमकं काय घडतंय ?
img
Nandini khandare More
मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  पुन्हा उपोषणाला बसले आहेत. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. 

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून . त्यांची प्रकृती काही प्रमाणात खालावलेली दिसत आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक आज सकाळी अंतरवाली सराटी येथे आले. पण मनोज जरांगेंनी वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिला. पण काही वेळाने पुन्हा त्यांची तपासणी करणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उपोषणामुळे जरांगे यांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने वैद्यकीय पथकाकडून नियमित तपासणी केली जात आहे. मंगळवारी सकाळी डॉक्टरांचे पथक त्यांची तपासणी करण्यासाठी आले होते. मात्र जरांगे यांनी तपासणी करण्यास नकार दिल्याने पथकाला तपासणी न करताच परत जावे लागले. काही वेळाने पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकुडे यांनी दिली.

उपोषणाचा चौथा दिवस असल्याने जरांगे यांच्या प्रकृतीकडे समर्थकांचे तसेच प्रशासनाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकाकडून पुन्हा प्रयत्न केला जाणार आहे. वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी यासाठी त्यांच्याकडे वारंवार विनंती केली जात आहे. पण ते वैद्यकीय तपासणी करण्यास नकार देत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यरात्री मनोज जरांगेंची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून मराठा समाजाचा प्रतिसाद मिळत आहे. अंतरवाली सराटी येथे समर्थकांची गर्दी वाढत असून सरकारने तातडीने चर्चा करून मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, उपोषणाला ४ दिवस उलटूनही सरकारकडून अद्याप अधिकृत शिष्टमंडळ चर्चेसाठी आलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यरात्रीच्या भेटीमुळे प्रशासनाकडून जरांगे यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दुपारी सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, सरकारकडून चर्चेसाठी शिष्टमंडळ कधी दाखल होते? आणि मराठा आरक्षणाच्या मागणीवर काय भूमिका घेतली जाते? याकडे आता आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group