काँग्रेस खासदाराचा मोबाईल हॅक ! व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून तब्बल ६२ हजार रुपयांची मागणी
काँग्रेस खासदाराचा मोबाईल हॅक ! व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून तब्बल ६२ हजार रुपयांची मागणी
img
Nandini khandare More
हल्ली सायबर क्राईम वाढला असून आता राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छावयांचा मोबाईल हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईलचा गैरवापर करत अज्ञात व्यक्तींनी खासदार बच्छाव यांच्या नावाने त्यांच्या कुटुंबियांसह अनेकांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून तब्बल ६२ हजार रुपयांची मागणी केली. हा प्रकार लक्षात येताच डॉ. बच्छाव यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शोभा बच्छाव यांचा फोन हॅक झाल्यानंतर त्यांच्या नावाने अनेकांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवण्यात आले. या मेसेजमध्ये, “माझ्या खात्यात ६२ हजार रुपये जमा करा, मी दोन तासांत परत करेन,” अशी मागणी करण्यात आली होती. खासदारांच्या नावानेच हा मेसेज आल्याने काही जणांनी त्यावर विश्वास ठेवण्याची शक्यता निर्माण झाली होती.

मेसेज करून पैशांची मागणी दरम्यान, बच्छाव यांच्या संपर्कातील काही व्यक्तींना संशय आल्याने त्यांनी थेट खासदारांशी संपर्क साधला. त्यानंतर आपल्या मोबाईलचा गैरवापर होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोणतीही आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी त्यांनी वेळ न दवडता सायबर पोलिसांना याबाबत माहिती दिली. तक्रार मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल रिस्टार्ट करण्यात सायबर पोलिसांना यश आले.पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल या घटनेमुळे सोशल मीडिया आणि मोबाईल खात्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः परिचित व्यक्तीच्या नावाने पैशांची मागणी करणारे मेसेज आल्यास त्यावर तातडीने विश्वास ठेवू नका. तसेच अशा प्रकारचे संशयास्पद संदेश किंवा आर्थिक मागणी आल्यास तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group