नाशिक : नाशिक रोडवरील मुक्तीधाम विद्युत उपकेंद्रामधून निघणाऱ्या लॅमरोड या ११केव्ही वीज वाहिनीच्या तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरीता शनिवारी दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत वीज पुरवठा टप्याटप्याने बंद राहणार आहे.
सदर विद्युत वाहिनी बंद असल्याने खालील परिसरातील वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने प्रभावित राहील. यामध्ये राजवाडा ,जयाउद्दीन डेपो ,सुभाष रोड, मालधक्का रोड ,गुलाबवाडी, गौतम छात्रालय, पाटील गॅरेज सिद्धार्थ नगर , पवार वाडी, विहितगाव, बागुल नगर देवळाली गाव, साठे नगर, गांधी पुतळा, सौभाग्य नगर आणि परिसर याचा समावेश आहे.
देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.