रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेशन कार्डमध्ये जात अपडेट करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमचा साठीच आहे. कारण आता जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जारी करण्यात आलेल्या रेशन कार्डमध्ये जात माहिती अपडेट करण्याची प्रोसेस सध्या तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण अर्थात SIR २०२६ च्या पार्श्वभूमीवर खाद्य, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार विभागाने हा निर्णय घेतला आहे.
विभागाने स्पष्ट केलं आहे की, मतदार यादीच्या अंतिम प्रकाशनापर्यंत रेशन कार्डामधील जात अपडेट करण्याची प्रोसेस बंद राहणार आहे. याबाबत सरकारचे उपसचिव राम कृष्ण कुमार यांनी रांची, धनबाद आणि जमशेदपूरसह सर्व जिल्ह्यांच्या संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. या आदेशाची प्रत सर्व उपायुक्तांनाही पाठवण्यात आली आहे.
कोणत्या ५ प्रवर्गांची जात अपडेट होणार होती? रेशन कार्डामध्ये , SC, BC-१, BC-२ आणि PVTG या पाच प्रवर्गांची जात माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यासाठी लाभार्थी मोठ्या संख्येने प्रखंड आणि अंचल कार्यालयांमध्ये जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करत होते. मात्र, SIRच्या कामामुळे या अर्जांच्या प्रक्रियेवरही परिणाम होणार आहे.
SIRच्या कामासाठी कर्मचारी तैनात राज्यात SIR अंतर्गत मतदार यादीच्या नोटीस टप्प्यात मिळालेले दावे आणि हरकतींची पडताळणी सुरू आहे. या कामासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच उपायुक्तांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांतल्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्राचे अर्ज वेळेत निकाली काढणे प्रशासनाला सध्या शक्य होत नसल्याचे विभागाने नमूद केले आहे.
आधीही जारी झाले होते आदेश रेशन कार्डमधील जात अपडेटबाबत १ जुलै आणि २८ जुलै २०२६ रोजी यापूर्वीही निर्देश देण्यात आले होते. मात्र, आता ८ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी तथा सचिव, मंत्रिमंडळ (निवडणूक) विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे. त्यामुळे रेशन कार्डमध्ये जात माहिती अपडेट करण्यासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना सध्या प्रतीक्षा करावी लागणार आहे. मतदार यादीचे अंतिम प्रकाशन झाल्यानंतरच ही प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.