ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का ! पोटनिवडणुकीतील उमेदवार...
ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का ! पोटनिवडणुकीतील उमेदवार...
img
Nandini khandare More
पश्चिम बंगाल मधील राजकरणात सध्या मोठे भूकंप होत असून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर आता नंदीग्राममधील उमेदवारानेही माघार घेतली आहे. पोटनिवडणुकीत उमेदवारी दिलेल्या संचिता प्रधान डे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतल्यानंतर मोठा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संचिता डे यांनी उमेदवारी मागे घेतली. संचिता डे यांच्या निर्णयाने ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठी एक दिवस राहिला आहे. पश्चिम बंगालमधील 2 जागांवर 6 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्याआधीच नंदीग्राममधील उमेदवार संचिता डे यांनी मुख्यमंत्री अधिकारी यांची भेट घेऊन मोठा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. भेट घेतल्यानंतर काही वेळात त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. 

ममता बॅनर्जी यांच्या हातातून पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर संचिता प्रधान डे यांनी अर्ज मागे घेतला. पश्चिम बंगालमध्ये रेजीनगर आणि नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचे नाव आणि चिन्ह गोठवलं आहे. त्यानंतर आयोगाने दोन्ही गटाकडून तीन-तीन पर्याय मागितले. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या गटाला ममता एआयटीएमसी’ नाव आणि फुटबॉलपटूचे चिन्ह देण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group