Nashik Crime : मध्यवर्ती कारागृहात कैद्याची आत्महत्या
Nashik Crime : मध्यवर्ती कारागृहात कैद्याची आत्महत्या
img
दैनिक भ्रमर
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत पोलीस शिपाई गोविंद मोरे यांनी खबर दिली आहे. त्यात म्हटले आहे, की न्यायाधीन बंदी नंदू पिराजी माळी (वय २८, रा. मध्यवर्ती कारागृह) याने बॅरेकच्या मागील बाजूस गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याने त्याला मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास विभुते यांनी तपासून मृत घोषित केले. 

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नंदू माळी हा पोक्सोच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत होता. नैराश्यात येऊन त्याने हे पाऊल उचलले असे पोलीस सुत्रांनी सांगितले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group