अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला होता. संपूर्ण राज्यात नवरात्रोस्तवाचा सण मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत असून गरबा आणि दांडिया देखील मोठ्या प्रमाणत खेळले जाते तसेच मोठं मोठे गरबा नाईटचे आयोजनही केले जातात. मात्र सध्या या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. नवरात्र सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरस झाली आहे. Rent A Garba Partner ची पोस्टर्स सध्या अनेक ठिकाणी दिसत असून हा फक्त आता मजेचा किंवा सोशल मीडिया ट्रेंडचा विषय राहिलेला नाही. मुंबईसह ही पोस्ट देशभरातील अनेक शहरात दिसून आली. सोशल मीडियावर हे अकाऊंट समोर आल्यावर हे प्रकरण आता सायबर क्राइमच्या तपासा अंतर्गत आलं आहे.या पोस्ट मुले नवा वाद उफाळून आला आहे.
याचदरम्यान आता भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी या पोस्टविरोधात भूमिका घेतली आहे. सदर “Rent a Garba Partner” ॲप तात्काळ बंद करण्यात यावे, असं लेखी निवेदन त्यांनी मीरा-भाईंदर वसई विरार चे आयुक्त अनिकेत कौशिक यांना दिलं आहे. सोशल मीडियावर 1000 ते 6500 रुपयांपर्यंत गरबा पार्टनर देण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या जाहिरातींमार्फत महिला व तरुणींची फसवणूक व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. ॲपचे मालक, निर्माते आणि जाहिरातदारांवर कठोर गुन्हे दाखल करून तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
यापूर्वीच मुंबईतील भाजप नेते संजय उपाध्य्या यांनीही मुंबई पोलिसांना पत्र लिहीलं होतं. “Rent a Garba Partner या जाहिरातींमागे कोण आहे, आणि त्यांचा नेमका उद्देश काय आहे, हे शोधावे अशी मागणी त्यांनी केली होती. तर आता आनदार नरेंद्र मेहाता यांनी देखील हे ॲप तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी त्यांच्या निवेदनातून केली आहे. तसेच या अॅपच्या फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी पोलिसांनी महिला व तरुणींमध्ये जनजागृती करावी , असंही त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.