भाईजान आता यूट्यूबवर! सलमान खानने सुरू केलं यूट्यूब चॅनेल
भाईजान आता यूट्यूबवर! सलमान खानने सुरू केलं यूट्यूब चॅनेल
img
Nandini khandare More
सर्वांचा आवडता बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या सोशल मीडियावर साध्य अक्टिव्ह मोड मद्ये असल्याचं पाहायला मिळतंय. भाईजान सध्या इंस्टाग्रामवर देखील मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह राहत असून आता  सलमान खानने यूट्यूब चॅनेल सुरू केलंयं 

ने चाहत्यांसाठी एक खास घोषणा केली आहे. सलमानने शुक्रवारी त्याचे यूट्यूब चॅनेल सुरू केले. या चॅनेलच्या माध्यमातून तो चाहत्यांसोबत वैयक्तिक आयुष्य, व्यावसायिक प्रवास आणि चित्रपटांच्या पडद्यामागील खास क्षण शेअर करणार आहे. एका मजेशीर टीझर शेअर करुन त्याने या नव्या यूट्यूब चॅनेलची घोषणा केली. 

हा व्हिडिओ शेअर करताना सलमानने, ‘चला सुरुवातीपासून सुरुवात करूया... माझे अधिकृत यूट्यूब चॅनेल. तुम्हाला येथे A ते Z पर्यंत सर्व काही पाहायला मिळेल,’ असे म्हटले. चॅनेलने पहिल्याच दिवशी ३६ हजारांहून अधिक सबस्क्राइबर्सचा टप्पा पार केला होता. सध्या या चॅनेलवर अनेक शॉर्ट्स आणि पहिला प्रिव्हूव व्हिडिओ शेअर केला आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून चाहत्यांना सलमानच्या दैनंदिन आयुष्याची झलक पाहता येणार आहे.

सलमान खानच्या आगामी चित्रपटांचीही चर्चा कामाच्या बाबतीत सलमान खान सध्या ‘बिग बॉस २०’चे सूत्रसंचालन करत आहे. याशिवाय तो लवकरच ‘मातृभूमी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पूर्वीचे नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ असे होते. अपूर्व लाखिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून चित्रांगदा सिंगचीही महत्त्वाची भूमिका आहे. तसेच, सलमान दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक वामसी पैदिपल्ली यांच्यासोबत ‘SVC63’ या चित्रपटावरही काम करत आहे. या चित्रपटात नयनताराची भूमिका असून तो २०२७ च्या ईदला प्रदर्शित करण्यात येणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group