धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी सीजेपीन आणि सोनम वांगचूक यांनी एकत्र आंदोलन केले होते. वांगचूक यांनी केलेल्या उपोषणामुळेच सरकावर दबाव आला. आता पुन्हा एकदा सीजेपीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन उभे केलेय. अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात असल्याने आता या आंदोलनाचे नेतृत्त्व सीजेपीचाच भाग असलेले अजिंक्य शिंदे हे करत आहेत. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर हे आंदोलन नियोजित आहे. परंतु सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना दिल्लीच्या विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले आहे. याचदरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे..
आंदोलनावर बोलताना वांगचूक यांनी महत्त्वाचे भाष्य केले. त्यांनी सरकारला उपोषण किंवा पदयात्रेचा इशारा दिलाय. सोबतच देश आता अघोषित आणीबाणीच्या छायेखाली असल्याचाही थेट आरोप त्यांनी केलाय.सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्तदेशातील सर्वात मोठी लोकशाही सध्या अघोषित आणीबाणीच्या परिस्थितीत आहे. आजच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी अनेक नेते पुढे आले होते. हे पाहून मला आनंद झाला होता. मात्र त्या सर्व नेत्यांना अटक करण्यात आली, असे म्हणत त्यांनी पोलिसांच्या तसेच सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या सर्व नेत्यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. जर उद्यापर्यंत या नेत्यांना सोडले नाही, तर आपल्याला उपोषण किंवा पदयात्रेचा मार्ग पत्करण्यास भाग पाडले जाईल, असा कडक इशारा वांगचुक यांनी दिला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.