मोठी बातमी ! राज्यातील आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर;मदतीबाबत मोठा निर्णय
मोठी बातमी ! राज्यातील आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर;मदतीबाबत मोठा निर्णय
img
Nandini khandare More

राज्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.  राज्यातील सुमारे २६५ तालुक्यांमध्ये काही दिवसांपूर्वीच दुष्काळ जाहीर झाला होता. मात्र आता राज्यातील दुष्काळाची तीव्रता आणखी वाढली असून, राज्यातील आणखी ४० तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३०५ वर पोहोचली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भातही त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम जमा केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तसेच कर्जमाफीचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group