तुम्ही WhatsApp युजर्स असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. WhatsApp नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स लॉन्च करत असत, आत पुन्हा एकदा WhatsApp ने एकी भन्नाट फिचर आणल आहे. या फीचरमुळे यूजर्सना मेसेज, फोटो आणि व्हिडिओ ठरावीक वेळेसाठी शेड्यूल करता येणार आहेत. त्यामुळे एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा महत्त्वाची माहिती पाठवायची असेल, तर त्यासाठी ठरलेल्या वेळी ऑनलाइन राहण्याची गरज भासणार नाही. शेड्यूल केलेला मेसेज निवडलेल्या वेळी आपोआप पाठवला जाऊ शकतो.
मिडिया रिपोर्टनुसार, WhatsApp सध्या या फीचरची काही अँड्रॉइड बीटा यूझर्ससाठी चाचणी करत आहे. WABetaInfo च्या अहवालानुसार, WhatsApp च्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.26.40.7 वापरणाऱ्या काही यूझर्सना ही सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र, हे फीचर सर्व यूजर्ससाठी कधी सुरू होणार याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
मेसेज शेड्यूल करण्याची प्रोसेस तुम्ही हे फीचर अगदी सोप्या पद्धतीने वापरू शकता. यूजर्सना संबंधित चॅटमध्ये जाऊन मेसेज टाइप करावा लागेल. मग 'Send' बटण काही वेळ दाबून ठेवल्याने तारीख आणि वेळ निवडण्याचा ऑप्शन दिसेल. वेळ सेट केली की मेसेज शेड्यल होईल आणि ठरलेल्या वेळी पाठवला जाईल. फोटो आणि व्हिडिओ शेड्यूल होणार का?
WhatsApp च्या या फीचरमध्ये फक्त टेक्स्ट मेसेजच नाही, तर लिंक, फोटो आणि व्हिडिओही शेड्यूल करता येऊ शकतील. रिपोर्टनुसार, एका वेळी एक फोटो किंवा व्हिडिओ शेड्यूल करण्याचा पर्याय मिळू शकतो. फोटो पाठवण्याआधी त्यात आवश्यक बदल करता येतील.तसेच कॅप्शन जोडण्याची सुविधाही उपलब्ध होईल.