महत्वाची बातमी !   राज्यभरात 'आपले सरकार' पोर्टल ''या'' तारखे पर्यंत राहणार बंद; आजच...
महत्वाची बातमी ! राज्यभरात 'आपले सरकार' पोर्टल ''या'' तारखे पर्यंत राहणार बंद; आजच...
img
Nandini khandare More

 एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.  आजपासून राज्यभरात ‘आपले सरकार’ पोर्टलसह अनेक महत्त्वाच्या ऑनलाइन सेवा बंद राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शासकीय दाखले, विविध प्रमाणपत्रं आणि इतर सरकारी सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसू शकतो. मात्र, या सेवा नेमक्या कोणत्या तारखेपर्यंत बंद राहणार आहेत हे सविस्तर जाणून घेऊया 

राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ पोर्टलसह विविध शासकीय ऑनलाइन सेवा आज सायंकाळी ४ वाजल्यापासून २१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत ऑनलाइन शासकीय कामे करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणे तसेच इतर शासकीय सेवांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी महत्त्वाची कामे शक्यतो सेवा बंद होण्यापूर्वी पूर्ण करून घ्यावीत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group