सध्या SIR प्रक्रियेवरून देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. त्यातच निवडणूक आयोगाने प्रशासकीय रचनेत मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत. २०२५ आणि २०२६ या काळात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील जवळपास १८ ते २० मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या नेतृत्वाखाली या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यानंतर २० महिन्यांच्या कालावधीत त्यांनी केलेल्या फेरबदलांपैकी हा सर्वात मोठा फेरबदल असल्याचे सांगितले जात आहे. द इकॉनॉमिक टाइम्समधील एका अहवालानुसार, ज्ञानेश कुमारांच्या २० महिन्याच्या काळात मुख्य निवडणूक अधिकारी तसेच निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी, विशेषतः उप निवडणूक आयुक्त (डीईसी) यांच्या स्तरावर अनेक महत्त्वाचे बदल झाले.
एका अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पण २०२५-२६ या कालावधीत जास्त बदल्या झाल्या आहेत. फेब्रुवारी २०२५ पासून आतापर्यंतः मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या २० महिन्यांत सुमारे १८ ते २० मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मे २०२२ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सुमारे ३३ महिन्यांच्या कार्यकाळात जवळपास २३ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या कालावधीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचाही समावेश हो
यााधी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि सुशील चंद्र यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास २९ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. या कालावधीत लोकसभा निवडणुका देखील झाल्या होत्या. अहवालानुसार, लोकसभा निवडणुकांदरम्यान मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. पण २०२५ आणि २०२६ या कालावधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच राहिले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त बदल्या झाल्या आहेत.
दरम्यान, प्रशासकीय सातत्य राखण्यासाठी निवडणूक आयोग साधारणत: मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला कमीत कमी ३ वर्षांसाठी पदावर कायम ठेवले जाते. पण अलीकडच्या ७ बदल्यांमध्ये अशा अधिकाऱ्यांचा समावेश आहे ज्यांनी या पदावर २ वर्षांपेक्षा कमी काळ काम केले आहे. २०२५ मध्ये ८ ते ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर २०२६ मध्ये आतापर्यंत १० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.