स्वप्नांच्या नगरीत प्रदूषणाचे सावट ! मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर
स्वप्नांच्या नगरीत प्रदूषणाचे सावट ! मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर
img
Nandini khandare More
मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत वायुप्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. हवेची खालावलेली गुणवत्ता, वाढते धूलिकण आणि वाहनांचा धूर यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जागतिक प्रदूषण क्रमवारीत मुंबईचा तिसरा क्रमांक असल्याच्या वृत्ताने या चिंतेत आणखी भर घातली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना याचा विशेष धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा स्वच्छ हवेचा श्वास मिळणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अलीकडील आकडेवारीनुसार, मुंबई हे जगातील तिसरे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. शहराच्या हवेच्या गुणवत्ता पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने, एक्यूआयधोकादायक पातळीवर पोहोचला आहे. काल मुंबईचा सरासरी एक्यूआय १६६ नोंदवला गेला, जो आरोग्यासाठी हानिकारक मानला जातो.

 मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर असल्याचे IQAir च्या अहवालातून समोर आले आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता अतिशय खालावली आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. अवघ्या आठवड्याभरात मुंबई शहर पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आले आहे. IQAir च्या अहवालातून प्रदूषणाची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.

मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 166 वर असून जगातील 122 शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश आहे. वाढते तापमान, मंदावलेले वारे आणि आर्द्रतेमुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. तसेच ‘एल निनो’च्या प्रभावामुळे प्रदूषण वाढण्याची तज्ज्ञांची शक्यता आहे. शहरात धूर आणि धुरक्याचे प्रमाण वाढल्याने दृश्यमानतेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group