मोठी राजकीय घडामोड  ! राष्ट्रवादीकडून शिंदेसेनेला धक्का; २०० पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
मोठी राजकीय घडामोड ! राष्ट्रवादीकडून शिंदेसेनेला धक्का; २०० पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
img
Nandini khandare More
सध्या राज्यातील राजकरणात मोठ्या हालचालींना वेग आलं असून आता रायगडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मोठी खेळी करत शिवसेना शिंदेगटाला मोठा धक्का दिला. रायगडामध्ये शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवींना राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार धक्का दिला. शेणवई गावातील शेकडो ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे.

रायगड जिल्ह्यात महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदेगटामध्ये शाब्दील वादासोबत कार्यकर्ते फोडण्याचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अलिबागचे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना जोरदार धक्का दिला आहे. २०० पेक्षा अधिक शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

आमदार महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघातील शेणवई आदिवासी वाडीतील २०० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील तटकरे यांनी या सर्वजणांचा पक्षात स्वागत केले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वादानंतर आता ग्रामिण भागात ताकद वाढवण्याचे काम सुरु झाले असून जोरदार पक्ष प्रवेश घेतले जात असल्याचे चित्र रायगडमध्ये पाहायला मिळत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group