महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. नागपुरात भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत रंगली असताना, अमरावतीत मतमोजणी प्रक्रियेवरून शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे, पुण्यातही मतमोजणीदरम्यान आक्षेप आणि वादामुळे वातावरण तापले. त्यामुळे नागपूर, अमरावती आणि पुण्यात नेमकं काय घडलं? मतमोजणीची सद्यस्थिती काय आहे आणि निकालाचे चित्र कोणत्या दिशेने जात आहे? जाणून घ्या सविस्तर. महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची मतमोजणी सध्या सुरू असून पहिल्याच फेरीत विविध केंद्रांवर राजकीय चुरस, आक्षेप आणि नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. नागपूरपासून अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत मतमोजणी दरम्यान रंजक आणि वादग्रस्त प्रसंग पाहायला मिळत आहेत.
नागपूर पदवीधर मतदारसंघ
नागपूरमध्ये ८४ टेबलवर मतमोजणी सुरू असून, सुरुवातीच्या २० टेबलवर भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत. मात्र, मतमोजणीदरम्यान काही ठिकाणी राजकीय वातावरण तापले आहे. मोजणीदरम्यान ८ मतपत्रिका जास्त निघाल्यामुळे आक्षेप घेतला असल्याचे नितेश कराळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, "पहिल्या पसंतीत निकाल लागणार नाही, यासाठी दुसरी पसंतीची मतमोजणी करावी लागेल," असा दावा त्यांनी केला आहे. मतदान प्रक्रियेत कर्मचारी अवैध मतं ग्राह्य धरत असल्याचा आक्षेप भाजप कार्यकर्त्यांनी घेतला आहे. भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात अत्यंत अटीतटीची चुरस सुरू असून, तिसऱ्या क्रमांकावर बंडखोर उमेदवार नितेश कराळे मते घेताना दिसत आहेत.
एकूण मोजणी : नागपूर विभागात ४४५ मतदान केंद्रावरील ७८८ मतपेटीतून एकूण १,६५,७०५ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. तसेच ३४ पोस्टल मतपत्रिका बाद झाल्यानंतर एकूण १,६५,९०९ मतपत्रिकांची मोजणी सुरू आहे. प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका एका फेरीत मोजल्या जात आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघ सुधाकर कोहळे (भाजप) अभिजित वंजारी (काँग्रेस - विद्यमान आमदार) नितेश कराळे(अपक्ष / बंडखोर)
पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ: वैध-अवैध मतपत्रिकांचे वर्गीकरण सुरू पुण्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी १०० टेबल मांडण्यात आले आहेत. मतपत्रिकांचे ५०-५० च्या संचामध्ये वर्गीकरण करून वैध आणि अवैध मतपत्रिका वेगवेगळे करण्याचे काम वेगात सुरू आहे. पुणे शिक्षक मतदारसंघ कौस्तुभ गावडे (भाजप) जयंत आसगावकर (काँग्रेस - विद्यमान आमदार) सचिन सानप (शिवसेना) दत्तात्रय सावंत (अपक्ष) पुणे पदवीधर मतदारसंघ डॉ. स्मिता योगेश जाधव (भाजप) हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष) सुनील मोदी (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)