राजकीय वर्तुळात खळबळ ! भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, शिंदे सेनेच्या नेत्यावर आरोप ; काय आहे प्रकरण ?
राजकीय वर्तुळात खळबळ ! भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, शिंदे सेनेच्या नेत्यावर आरोप ; काय आहे प्रकरण ?
img
Nandini khandare More

सध्या राजकीय वर्तुळात अनेक मोठमोठया घडामोडी घडत असून आता आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सोलापूरमधील सांगोला तालुक्यातून ही घटना समोर आली आहे. भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह करचे यांची डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात तीव्र खळबळ उडाली आहे.

या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून सोलापूरमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. शिंदे सेनेच्या नेत्यावर हत्या घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील तिप्पेहळ्ळी परिसरात घडली. प्रतापसिंह करचे हे स्वतःच्या चारचाकी गाडीतून प्रवास करत असताना, त्यांच्यासोबत असलेल्या संशयित आरोपी हर्षवर्धन ऐवळे आणि विक्रम घरडे यांनी बंदुकीतून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, या हत्येमागे मोठा राजकीय कट असल्याचा गंभीर आरोप मृत प्रतापसिंह यांच्या पत्नी अर्चना करचे यांनी केला आहे. आटपाडी येथील शिंदे सेनेचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील, त्यांचे बंधू शिवाजी पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनीच कट रचून सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याची लेखी तक्रार करचे कुटुंबीयांनी सोलापूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिली आहे.

याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे‌."राज्यात भाजपचे सरकार असतानाही एका भाजप कार्यकर्त्याची अशी निर्घृण हत्या होत असेल, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय?" असा उद्विग्न सवाल उपस्थित करत, मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आम्हाला तात्काळ न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अर्चना करचे यांनी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group