बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या प्रेमकहाणीची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. लग्नाआधी या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता आणि ब्रेकअपची वेळही आली होती. 'कधीकधी तू माझ्या खूप जवळ येतोस आणि कधी अचानक दूर जातोस', अशा शब्दांत कियाराने आपल्या भावना व्यक्त केल्याची चर्चा आहे.
‘शेरशाह’च्या शूटिंगदरम्यान हे जोडपं खूप जवळ आलं आणि नंतर त्यांनी लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, ‘शेरशाह’च्या निर्मितीदरम्यान त्यांचं एकदा ब्रेकअपही झालं होतं. कियारानं स्वतः ब्रेकअपचं कारण उघड केलं.
सिद्धार्थच्या वागण्यामुळे ब्रेकअप झालेल
अलीकडेच, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोच्या अंतिम आणि नवव्या सीझनमध्ये दिसले. यादरम्यान, त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा केली. अभिनेत्रीनं खुलासा केला की, त्यांच्या नात्याच्या सुरुवातीला सिद्धार्थ कधी तिच्याशी खूप चांगला वागायचा तर कधी खूप उद्धटपणे, ज्यामुळे तिला त्रास झाला.
‘शेरशाह’चे चित्रीकरण कारगिलमध्येही झालं होतं. कारगिलला जाण्यापूर्वी कियारानं सिद्धार्थशी संवाद साधला होता. कियारा सिद्धार्थला म्हणाली, ‘कधीकधी तू माझ्या खूप जवळ येतोस, आणि कधीकधी पूर्णपणे दूर जातोस. पण माझ्यासाठी, तू एकतर पूर्णपणे असतोस किंवा अजिबात नसतोस. ही मधली अवस्था माझ्या आकलनापलीकडची आहे. मी हे सहन करू शकत नाही.’
सिद्धार्थ त्या अभिनेत्रीला म्हणाला होता, ‘मला माहीत आहे की, तू अशी आहेस की, जर मी तुला वचन दिलं, तर ते एक घट्ट नातं असेल. सध्या मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. माझ्या कामाच्या आड इतर कोणतीही गोष्ट येऊ नये असं मला वाटतं.’
यानंतर, दोघांनी एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. पण, कारगिलमधील कठीण परिस्थितीत शूटिंग करत असतानाही, सिद्धार्थनं अभिनेत्रीला दररोज फोन केला आणि ते सलग ३० दिवस बोलले. ज्या ठिकाणी सिग्नल मिळणं कठीण होतं, तिथेही त्यांनी आपल्या नात्यासाठी वेळ काढला. लवकरच, ते पुन्हा एकत्र आले.
दरम्यान, सिद्धार्थ आणि कियारा यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली. जुलै २०२५ मध्ये त्यांच्या घरी सराया नावाच्या मुलीचा जन्म झाला.