अमूल आणि मदर डेअरीनंतर आता गोकुळ दूधही महागणार?
अमूल आणि मदर डेअरीनंतर आता गोकुळ दूधही महागणार?
img
Nandini khandare More

 अमूल आणि मदर डेअरीने दूध दरात वाढ केल्याने ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे दरम्यान आता पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य दूध उत्पादक संघ गोकुळच्या दूध खरेदी आणि विक्री दरामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दूध खरेदी दरात आणि विक्री दरात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ अपेक्षित आहे. गोकुळच्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये या दरवाढीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गोकुळ दूध संघाकडून विक्री दरात वाढ करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, उद्या होणाऱ्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्याच बैठकीत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत दूध दरवाढीबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोकुळच्या दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय झाल्यास त्याचा परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवरही होणार आहे. कारण ग्राहकांकडून दूध विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून दूध उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या दरातही वाढ करावी लागणार आहे. 

 अमूल आणि मदर डेअरीने दूध दरात वाढ केल्याने ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. आता गोकुळनेही दरवाढ केली, तर ग्राहकांच्या मासिक खर्चात आणखी भर पडू शकते. मात्र, गोकुळच्या दूध दरात नेमकी किती वाढ होणार आणि ही वाढ कधीपासून लागू होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे दूध उत्पादकांसह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group