चेन्नई: भारताच्या चांद्रयान 3 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं निधन झालं आहे. शनिवारी संध्याकाळी चेन्नईमध्ये त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या 64 व्या वर्षी एन. वलारमथी यांनी अखेरचा श्वास घेतला.
इस्रोच्या चांद्रयान-3 मिशन लाँचच्या काऊंडाऊन मागील आवाज हा एन. वलारमथी यांचा होता. 14 जुलै रोजी प्रक्षेपित केलेलं चांद्रयान-3 हे त्यांच्यासाठी अंतिम काउंटडाउन ठरलं.