श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा गजरातच्या आज देशभरात मोठ्या थाटामाटात श्रीकृष्णजन्माष्टमी' साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. जन्माष्टमीच्या दिवशी घरोघरी श्रीकृष्णाच्या बालस्वरुपाची पूजा केली जाते. तसेच उपवास ठेवला जातो.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे रोहिणी नक्षत्र 6 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 09.20 पासून सुरू होईल. तो दुसऱ्या दिवशी 07 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10:25 वाजता संपेल.भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
आज मध्यरात्री 12 च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म होईल. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आज उत्साहात साजरा होणार आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला हा उत्सव साजरा केला जातो.
या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरा नगरीत देवकीच्या आठव्या अपत्याच्या रूपात कंसाच्या कैदेत झाला. जन्माष्टमीच्या दिवशी घरोघरी श्रीकृष्णाच्या बालस्वरुपाची पूजा केली जाते. भाविक भजन आणि कीर्तन गात या दिवशी उपवास करतात, तसेच भव्य सजावटही करतात. दरम्यान, आज मध्यरात्री 12 च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म होईल. पंचागानुसार यावर्षी जन्माष्टमी 6 आणि 7 सप्टेंबर 2023 असे दोन दिवस निश्चित करण्यात आले आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे.गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि रात्री बारा वाजता कृष्णजन्माचा उत्सव साजरा करतात.
यंदाची जन्माष्टमी विशेष
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाची पूजा करणे अत्यंत शुभ आहे. धार्मिक पुराणानुसार, ज्यावेळेस कृष्णाचा जन्म झाला, त्यावेळी रोहिणी नक्षत्र होते. यंदाची जन्माष्टमी विशेष मानली जाते. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्र, वृषभ राशीत आणि बुधवारी झाला असे सांगितले जाते. त्यामुळे बुधवारी कृष्णाचा जन्मदिवस साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीला देवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे.