'त्या' गोळीबार प्रकरणातील  शिंदे गटाच्या नेत्याला डिस्चार्ज ; समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी
'त्या' गोळीबार प्रकरणातील शिंदे गटाच्या नेत्याला डिस्चार्ज ; समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी
img
Dipali Ghadwaje
उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील महेश गायकवाड यांना २६ फेब्रुवारी म्हणजेच आज डिस्चार्ज मिळणार आहे. महेश गायकवाड हे रुग्णालयातून सुखरूप घरी परतणार, हे समजताच त्यांच्या समर्थकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड जखमी झाले होते. त्यांच्या ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर आता तब्बल २४ दिवसांनी महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळणार आहे. महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी कल्याणमध्ये जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. 

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीचा वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या होत्या. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते . या उपचारादरम्यान डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे महेश गायकवाड यांच्या दीर्घ आयुष्यासाठी समर्थकांकडून होम हवन, मंत्र जप केले जात होते.

खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर 24 दिवसानंतर महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे . दरम्यान महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत . 

शहरातील 'टायगर अभी जिंदा है' या आशयाचे बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. तर महेश गायकवाड हे आपल्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या घटनेनंतर महेश गायकवाड पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधणार असल्याने महेश गायकवाड काय बोलणार याकडे आता सर्वांचच लक्ष लागले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group