महाशिवरात्री ही माघ महिन्यातील चतुर्दशीला अमावस्येच्या एक दिवस आधी साजरी केली जाते. परमपिता परमात्मा शिवाचे अवतरण ह्या सृष्टीवर कलियुग पूर्ण व्हावयाच्या काही वर्ष आधी झाले होते. जेव्हा की सारी सृष्टी अज्ञान व अंधकारात होती. यामुळेच शिव शब्दाचा संबंध रात्री शब्दाशी जोढला जातो. आणि शिवाच्या रात्री पूजा करण्याच्या विधीला अधिक महत्त्व दिले जाते.
श्री नारायण किंवा श्रीराम या देवतांचे पूजन दिवसा केले जाते. कारण श्री नारायण आणि श्रीीरामाचा जन्म क्रमशः सतयुग आणि त्रेतायुगात झाला होता. मंदिरात या देवतांना रात्री झोपवले जाते व सकाळी उठविले जाते; परंतु परमात्मा शिवाच्या पूजेसाठी भक्तगण स्वतः रात्री जागरण करतात.
भगवान शिवकल्याणकारी
आज पूर्वलिखित रहस्याला न समजल्याने काही लोक असे म्हणतात, की ‘शिव’ हे तमोगुणांचे प्रेरक आहेत. त्यामुळे त्यांची पूजा रात्री होते आणि शिवरात्रीही रात्रीच साजरी केली जाते. कारण रात्र ही तमोगुणाची प्रतिनिधी आहे; परंतु त्यांची ही समजूत अगदी चूक आहे.
कारण वास्तविक शिव हे तमोगुणांचे प्रेरक नसून ते त्यांचे संहारक अथवा नाशक आहेत. जर शिव हे तमोगुणांचे प्रतिनिधी असते, तर त्यांना शिव म्हणजे कल्याणकारी, पापकटेश्वर, मुक्तेश्वर म्हणणे निरर्थक झाले असते. शिव याचा अर्थ आहे ‘कल्याणकारी’. शिव भगवानाचे कर्तव्य आहे, की, सर्व आत्म्याचे कल्याण करणे व तमोगुणाचा अर्थ आहे, अकल्याणकारी जे की पापवर्धक व मुक्तीला बाधक आहे. कल्पाच्या शेवटी परमात्मा शिव हे अवतरित होऊन अज्ञानता, दु:ख व अशांतीला समाप्त करतात, म्हणून खरे तर शिवरात्री साजरी केली जाते.
अशी साजरी करा शिवरात्री
भक्त लोक शिवरात्रीच्या दिवशी सगळी रात्र जागरण करतात आणि जेवल्याने आळस व झोप, मादकतेचा अनुभव येईल म्हणून त्यादिवशी ते जेवण करीत नाहीत, उपवास करतात व त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतील, अशी धारणा असते. खर्या अर्थाने मनुष्याला तमोगुणात ढकलणारे तर पाच मनोविकार आहेत. जोपर्यंत मनुष्य त्या मनोविकारांचा त्याग करीत नाही, तोपर्यंत त्याच्या आत्म्याचे पूर्ण जागरण होऊच शकत नाही व आशुतोष भगवान शिव पण त्यांच्यावर प्रसन्न होत नाही.
कारण स्वतः भगवान शिव हे ’कामारि’ मनुष्यावर प्रसन्न कसे होतील? माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या रात्री साजरा केला जाणारा शिवरात्री महोत्सव हा कलियुगातील त्या शेवटच्या वर्षाचे प्रतीक आहे, की ज्यात भगवान शिवाने मनुष्याला ज्ञानाद्वारे पावन करून त्याच कल्याण केले होते. खरे तर शिवरात्री हे व्रत संपूर्ण वर्षभर साजरे करायला हवे, कारण वर्तमान संगमयुगात परमात्म्याचे अवतरण झालेले आहे.
कलियुगी सृष्टीच्या महाविनाशाची सामग्री अॅटम, हायड्रोजन, परमाणू बॉम्बच्या रूपात तयार आहे, तर दुसरीकडे परमप्रिय परमात्याद्वारे विश्व नवनिर्माणाचे कार्यही संपन्न होत आहे. आता महाविनाशाच्या वेळेपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करा. त्यामुळे मनोविकारांवर ज्ञानयोगाद्वारा विजय प्राप्त करू शकू, हेच महाव्रत आहे, की जे शिवव्रत नावाने प्रसिद्ध आहे. आणि हाच शिवाचा मंत्र आहे, की जो ‘तारक मंत्र’ नावाने प्रसिद्ध आहे. ईश्वरीय ज्ञानयोगाच्या आधारे स्वतःस रात्रीतून (अज्ञानतेतून) दिवसाकडे (प्रकाशाकडे) नेण्याची महाशिवरात्री खर्या अर्थाने साजरी करू या.
- ब्रह्माकुमारी पुष्पादीदी
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, पंचवटी, नाशिक