अभियंत्यावर दुहेरी संकट; क्रिकेटच्या सट्टेबाजीत गमावले दीड कोटी रुपये, पत्नीनेही केली आत्महत्या
अभियंत्यावर दुहेरी संकट; क्रिकेटच्या सट्टेबाजीत गमावले दीड कोटी रुपये, पत्नीनेही केली आत्महत्या
img
दैनिक भ्रमर
सध्या क्रिकेटमध्ये सट्टेबाजीसारखा अपप्रकार सरार्स होऊ लागले आहेत. अनेक लोक यात उध्वस्त झाल्याचे पाहायला मिळते.

कर्नाटकमधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गा पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या दर्शन बालू नावाच्या या सहाय्यक अभियंत्यासोबत असाच एक प्रकार घडला. ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीत या अभियंत्याने दीड कोटी रुपये गमावले. झटपट श्रीमंत होण्यासाठी दर्शन बालू यांनी क्रिकेट सट्टेबाजीचा पर्याय निवडला. स्वत:कडे असलेले पैसे क्रिकेटच्या सट्टेबाजीत उडवले.

ते पैसे संपल्यावर लोकांकडून उधार पैसे घेतले. ते पैसे सट्टेबाजीत घालवले. यामुळे लोकांना तो पैसे परत देऊ शकला नाही. यामुळे ती लोक घरी येऊन धमक्या देऊ लागले. या प्रकारामुळे दर्शन बालू यांची पत्नी रंजीता हिने आत्महत्या केली. 

रंजीताने चिठ्ठी लिहून काही लोकांवर आरोप केले. दर्शन याने ज्या लोकांकडून पैसे घेतले होते, ती लोक घरी येऊन धमक्या देऊ लागले. रंजीता हिलाही ती लोक त्रास देऊ लागले. यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे रंजीताने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींपैकी तिन जणांना अटक करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group