“जिंदगी इम्तिहान लेती है..”, चे गायक कमलेश अवस्थी यांचे निधन
“जिंदगी इम्तिहान लेती है..”, चे गायक कमलेश अवस्थी यांचे निधन
img
दैनिक भ्रमर
मुकेश यांचा आवाज अशी ओळख मिळालेले गायक कमलेश अवस्थी यांचं अहमदाबादमध्ये निधन झालं आहे. मागच्या एक महिन्यापासून ते कोमामध्ये होतो. आज त्यांची प्राणज्योत मालवली. ‘गोपीचंद जासूस’ या सिनेमात कमलेश अवस्थी यांनी राज कपूर यांच्यासाठी पार्श्वगायन केलं होतं. ‘तेरा साथ है तो..’, ‘जिंदगी इम्तिहान लेती है..’ ही त्यांची गाणी विशेष गाजली. कमलेश अवस्थी यांच्या निधनामुळे संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.

कमलेश अवस्थी यांचा अल्प परिचय

कमलेश अवस्थी यांचा जन्म १९४५ मध्ये सावरकुंडला या ठिकाणी झाला होता. त्यांनी भावनगर विद्यापीठातून पीएचडी केली. भावनगर येथून त्यांनी कला गुरु भरभाई पंड्या यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संगीत करिअर सुरु केलं. संगीत क्षेत्रात त्यांनी पहिला अल्बम ‘ट्रिब्यूट टू मुकेश’ आणला. कमलेश अवस्थी यांनी हिंदी आणि गुजराती सिनेमांसाठी गायन केलं. त्यामुळे ते चांगलेच लोकप्रिय झाले. मुकेश यांच्या आवाजाची झलक त्यांच्या आवाजात जाणवत असे. ‘अमर उजाला’ने हे वृत्त दिलं आहे.

व्हॉईस ऑफ मुकेश ही ओळख कशी मिळाली?

राज कपूर यांच्या गोपीचंद जासूस या सिनेमासाठी त्यांनी पार्श्वगायक म्हणून गाणी म्हटली होती. देशाला मुकेश परत मिळाला आहे असं राज कपूर तेव्हा म्हणाले होते. राज कपूर यांनी कौतुक केल्यापासून व्हॉईस ऑफ मुकेश हीच ओळख त्यांना मिळाली होती. गुजराती गायन क्षेत्रात त्यांचा मोठा लौकिक होता. कमलेश अवस्थी यांनी अनेक गुजराती गाणी म्हटली होती. तसंच ते स्टेज शोजही करत. आज हा हरहुन्नरी गायक काळाच्या पडद्याआड गेला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group