नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा 'आज सुप्रीम' फैसला ; उमेदवारी राहणार की जाणार?
नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा 'आज सुप्रीम' फैसला ; उमेदवारी राहणार की जाणार?
img
दैनिक भ्रमर
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या महत्वपुर्ण निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने 2021 मधे अवैध ठरवलं होत. त्यानंतर या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद २८ फेब्रुवारीला पूर्ण झाला आहे. न्यायालयाने त्यांचा निकाल राखून ठेवला होता.

'या' कारणास्तव काँग्रेस नेते संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी

याप्रकरणी आज अंतिम निकाल येणार असून नवनीत राणा यांच्या उमेदवारीसाठी आजचा निकाल अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. या प्रकरणाच्या निकालाचं वाचन ओपन कोर्टात होणार असून, निकाल वेबसाईटवर अपलोड केला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. नवनीत राणा आज आपला नामाकंन अर्ज दाखल करणार असून आजच अमरावतीमध्ये अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपला अपेक्षितच निकाल येणार की काही नाट्यमय घडामोडी होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group