पहिल्या आगगाडीला तब्बल १७१ वर्ष पूर्ण
पहिल्या आगगाडीला तब्बल १७१ वर्ष पूर्ण
img
दैनिक भ्रमर
आशियातील खंडातील पहिली ट्रेन चारशे प्रवासी घेऊन अवघ्या ५७ मिनिटात मुंबई ते ठाणे दरम्यान आजच्या दिवशी अर्थात १६ एप्रिल १८५३ रोजी धावली होती. या पहिल्या ट्रेनला मंगळवारी १७१ वर्ष पूर्ण झाले. मध्य रेल्वेकडून हा इतिहास जपण्यासाठी आजही सीएसएमटी-ठाणे लोकल ट्रेनचा वेळापत्रकात काही बदल केलेला नाही. दीडशे वर्षांपासून त्याच वेळापत्रकावर सीएसएमटी-ठाणे धीमी लोकल धावत आहे. त्यामुळे ठाणे लोकल आशिया खंडाच्या रेल्वे विकासाची साक्षीदार आहे. भारतीय रेल्वेने १७१ गौरवशाली वर्षे पूर्ण केली. १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावलेली आशियातील (आणि भारतातील) पहिली ट्रेन बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून रवाना झाली. जसजशी वर्षे निघून गेली, तसतशी पहिली ट्रेन चालवणारी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे १९०० मध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीत विलीन झाली आणि उत्तरेकडे दिल्ली, ईशान्येला कानपूर आणि अलाहाबाद तसेच पूर्वेला नागपूरपासून व दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत त्याच्या सीमांचा विस्तार केला.

५ नोव्हेंबर १९५१ रोजी निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे या ५ विभागांसह मध्य रेल्वेचे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,२१९ मार्ग किमीपेक्षा जास्त नेटवर्क आहे. मध्य रेल्वे या राज्यांना ४७१ स्टेशन्सद्वारे सेवा देते.

त्याच वेळी सुटते आशियातील पहिली गाडी

गेल्या १७० वर्षात रेल्वेमध्ये अनेक बदल झाले. रेल्वे गाड्यांचे डबे, इंजिन यात बदल होत गेले. १९२५ मध्ये पहिली विजेवर धावणारी रेल्वे सुरू झाली. परंतु, रेल्वेने पहिल्या रेल्वे गाडीची वेळ आजही सीएसएमटी ते ठाणे याच स्थानकांसाठी राखून ठेवण्यात आलेला आहे. आठवण म्हणून मध्य रेल्वे आजही दुपारी ३ वाजून २८ मिनिटांनी ठाणे लोकल चालविते. सध्या लोकल फेऱ्याची संख्या जास्त असल्याने अनेकदा सीएसएमटी- ठाणे लोकलचा वेळापत्रक बदल झाला. परंतु ३. ३५ लोकल वेळ पाडण्यासाठी दुपारी ३.२५ ते ३. ३५ हा वेळ ठाणे लोकल चालवितोय अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

पहिल्या रेल्वे गाडीला सिंधू, सुलतान, साहिब इंजिन -

ब्रिटिश सरकारने "ग्रेट इंडियन पेनिन्सुल" (जी.आय.पी) या कंपनीला मुंबईपासून ते खानदेशाच्या दिशेने ५६ किमी लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्याची कंत्राट दिले होते. ब्रिटिश सरकारने १४ नोव्हेंबर १८४९ रोजी जेम्स जॉन बर्कले या अवघ्या ३० वर्षाच्या ब्रिटिश इंजिनियर वर रेल्वे प्रत्यक्षात साकरण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आणि त्यानंतर रेल्वेमार्गाचे भूमिपूजन ऑक्टोंबर १८५१ मध्ये करण्यात आलेले होते. ही पहिली १६ एप्रिल १८५३ ला दुपारी तीन वाजून ३५ मिनिटांनी मुंबई ते ठाणे दरम्यान आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. तेव्हा १४ डब्याच्या पहिल्या रेल्वेगाडी सिंधू, सुलतान आणि साहिब हे तीन महाकाय इंजिन जोडली होती. पहिल्या गाडीच्या शुभारंभासाठी ब्रिटिशांनी ४०० नागरिकांना निमंत्रण दिले होते. या पहिल्या रेल्वे प्रवाशांमध्ये मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ यांच्या समावेश होता. मुंबई दुपारी 3 वाजून ३५ मिनिटांच्या मुहूर्तावर पहिली गाडी धावली,त्यावेळी २१ तोफांची सलामी दिली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group