'या' देशात वर्षभराचा पाऊस झाला एकाच दिवसात ; विमानतळ तुंबले
'या' देशात वर्षभराचा पाऊस झाला एकाच दिवसात ; विमानतळ तुंबले
img
दैनिक भ्रमर
संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले. मुसळधार पावसामुळे दुबईच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली तसेच विमानतळावर पाणीच पाणी झाले होते. तीव्र वादळामुळे दुबई विमानतळावरील उड्डाणे काही काळ थांबवण्यात आली होती. मोठा पूर आल्यामुळे विमानतळाकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. मात्र नंतर पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

पुरामुळे आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. रात्रभर पाऊस सुरू झाल्यानंतर जगातील सर्वात व्यस्त विमानतळावर उड्डाण विस्कळीत झाले. संध्याकाळपर्यंत, १२० मिलिमीटर पाऊस झाला. इतका पाऊस येथे एका वर्षात पडतो. पावसामुळे यूएईमधील शाळा मोठ्या प्रमाणात बंद होत्या आणि सरकारी कर्मचारी घरून काम करत होते. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले.

अरब राष्ट्रांना मुसळधार पावसाने झोडपले

- दुबई (संयुक्त अरब अमिरात) : प्रामुख्याने वाळवंट प्रदेश असलेल्या संयुक्त अरब अमिरातसह शेजारील अरब राष्ट्रांमध्ये मंगळवारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली, यामध्ये संयुक्त अरब अमिरात मधील अनेक प्रमुख महामार्ग जलमय झाले.
- शेजारच्या ओमानमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या मोठ्या पुरात मृतांची संख्या १८ वर पोहोचली आहे आणि इतर अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत, असे देशाच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या राष्ट्रीय समितीने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ज्यात एका प्रौढ व्यक्तीसह वाहनात सुमारे १० शाळकरी मुले वाहून गेल्याचा देखील समावेश आहे, या नैसर्गिक त्रासदीवर ओमानच्या राज्यकर्त्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. ओमानसह बहारीन, कतार आणि सौदी अरेबियातही मुसळधार पाऊस पडला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group