शाहू महाराज सर्वाधिक ‘श्रीमंत’ उमेदवार ; 'इतक्या' कोटी संपत्तीचे मालक
शाहू महाराज सर्वाधिक ‘श्रीमंत’ उमेदवार ; 'इतक्या' कोटी संपत्तीचे मालक
img
दैनिक भ्रमर
कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली असून, त्यांच्या संपत्तीचे विवरण पुढे आले आहे. त्यामध्ये कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांची मालमत्ता सर्वाधिक २९७ कोटी रुपयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापुरातील अन्य उमेदवार शिवसेनेचे संजय मंडलिक, हातकणंगलेतील शिवसेनेचे धैर्यशील माने, स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांची मालमत्ता कोटींच्या घरात आहे.

 शाहू महाराजांच्या नावे स्थावर व जंगम अशी २९७ कोटींची संपत्ती आहे. त्यांची पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे ४१ कोटींची संपत्ती आहे. शाहूमहाराज हे निष्कर्जी आहेत. त्यांच्या नावे असलेल्या जमिनीची किंमत १२२ कोटी रुपये असून, आलिशान वाहनांची किंमत सहा कोटींवर आहे.

उकाड्यावर शिडकावा! 'या' भागात पुन्हा वादळी पावसाची शक्यता

मंडलिकांच्या मालमत्तेत वाढ

संजय मंडलिक यांच्याकडे १४ कोटी रुपयांची संपत्ती असून, मागील निवडणुकीपेक्षा  संपत्तीत चार कोटी ६५ लाख रुपयांची वाढ झाली आहे. गत निवडणुकीवेळी मंडलिक यांची मालमत्ता नऊ कोटी ७१ लाख रुपये इतकी होती. ती आता वडिलोपार्जित मालमत्तेसह १४ कोटी ३७ लाख रुपये झाली आहे. त्यांच्यावर तीन कोटी ४१ लाख रुपयांचे कर्ज आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group