ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामीचा इशारा ; या देशात ११ हजार नागरिकांना घर सोडण्याचे आदेश
ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामीचा इशारा ; या देशात ११ हजार नागरिकांना घर सोडण्याचे आदेश
img
दैनिक भ्रमर
हजारो फूट उंचीवरील रुआंग पर्वतावरील ज्वालामुखीचे गेल्या २४ तासांत पाच मोठे उद्रेक झाल्यानंतर सर्वत्र राख, दगड, लाव्हारस पसरला आहे. त्यामुळे प्रशासनाने ११,००० हून अधिक लोकांना परिसर सोडण्याचे आदेश दिले आहेत. सुलावेसी बेटाच्या उत्तरेकडील ज्वालामुखीमध्ये गेल्या २४ तासांत किमान पाच मोठे उद्रेक झाल्याचे इंडोनेशियाच्या ज्वालामुखी आणि भूगर्भीय आपत्ती निवारण केंद्राने सांगितले. बुधवारी आधी किमान ८०० रहिवाशांनी परिसर सोडला होता.

त्यानंतर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात पलायन होत आहे. २७ कोटी लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात १२० सक्रिय ज्वालामुखी आहेत. ज्वालामुखीचा काही भाग समुद्रात कोसळू शकतो आणि तेथे १८७१ च्या उद्रेकाप्रमाणे त्सुनामी येऊ शकते. टॅगुलंडांग बेट पुन्हा धोक्यात आले आहे. तेथील रहिवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

पेटीएम मध्ये मोठे बदल ; युजर्सना मिळणार 'ही' नवीन सुविधा

२०१८ मध्ये झाला होता ४३० लोकांचा मृत्यू

- इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, रहिवाशांना सुलावेसी बेटावरील मॅनाडो या जवळच्या शहरामध्ये स्थलांतरित
केले जाईल.
- २०१८ मध्ये इंडोनेशियाच्या अनाक क्रकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुमात्रा आणि जावाच्या किनारपट्टीवर त्सुनामी आली. त्यात ४३० लोकांचा मृत्यू झाला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group