भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
img
दैनिक भ्रमर
भारतीय जनता पक्षाने उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलंय. पूनम महाजन यांचा पत्ता कट करत भाजपकडून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपने नवी खेळी केली आहे. पूनम महाजन यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवणे भाजपने टाळले आहे. दरम्यान, भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या पूनम महाजन?

पूनम महाजन म्हणाल्या, खासदारकीच्या रुपाने मला गेल्या 10 वर्षात मुंबई उत्तर मध्य लोकसभेचे नेतृत्व करण्याची संधी मला दिले. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देते. मला खासदार म्हणून नाही, तर मुलीप्रमाणे स्नेह दिला. मी माझ्या लोकसभा क्षेत्रातील कुटुंबियांची, जनतेची नेहमी ऋणी राहिल आणि आशा करते की, आपलं नातं कायम टिकून राहिलं. माझे दैवत, माझे वडील दिवंगत प्रमोद महाजन जी यांनी मला 'राष्ट्र प्रथम' हा मार्ग दाखवला, तोच मार्ग मला आयुष्यभर चालवता यावा,अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव या देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल, असं पूनम महाजन यांनी म्हटलंय.

उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

पूनम महाजन यांना मतदारसंघात विरोध असल्याने भाजपने त्यांचं तिकीट कापल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रख्यात वकील आणि अनेक मोठ्या खटल्यांत सरकारचे वकील असणाऱ्या उज्जल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. उज्जल निकम यांचा सामना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याशी असणार आहे. निकम यांच्या रुपाने भाजपने नवा चेहरा मैदानात उतरवला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group