आजकाल प्रत्येक गोष्ट ही इंटरनेटवर अवलंबून आहे. भारतातील लोकांनी 5G इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली आहे. 5G हे एक हाय स्पीड नेटवर्क आहे. जे अतिशय जलद इंटरनेट अॅक्सेस देते. 5G नंतर आता भारत सरकार 6G कनेक्टिव्हीटीवर काम करत आहे. यासाठी इंडिया 6G अलायन्सची स्थापना करण्यात आली आहे.
सरकार लवकरच युरोपच्या इंडस्ट्री अलायन्स 6G सह सामंजस्य करारावर सही करणार आहे. सध्या या कराराचा मसुदा तयार करण्यात आला आहे. EU इंडिया ट्रेड आणि टेक्नॉलॉजी काउंसिल अंतर्गत अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीवर आपले सहकार्य वाढवत आहे. या नवीन करारामुळे 6G टेक्नॉलॉजी क्षेत्रात सहकार्य वाढेल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान लवकरच 6G आणि इंडस्ट्री अलायन्स 6G यांच्यात करार केला जाईल. हा करार दूरसंचार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत 6G आणि इंडस्ट्री अलायन्स 6G मधील पार्टनरशिपमधील अटींबाबत मसुदा तयार केला जात आहे. येत्या तीन महिन्यात हा करार केला जाण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेतसोबतदेखील असा करार करण्यात आला आहे.
भारत 6G ने अमेरिकेच्या नेक्स्ट G अलायन्ससोबत सामंजस्य करार केला होता. याअंतर्गत वायरलेस तंत्रज्ञान विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.दोन्ही देशांत सुरक्षित दूरसंचार निर्माण करण्यासाठी तसेच ग्लोबल डिजिटल इन्क्लूंजनला प्रोत्साहन देण्यासाठी हा करार करण्यात येणार आहे.
इंडिया 6G म्हणजे काय?
दूरसंचार विभागाने 2023 मध्ये इंडिया 6G ची स्थापना केली होती. भारतातील 6G टेक्नॉलॉजीची रचना, विकास, उपाययोजना आणि भारतीय स्टार्ट अप, मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम यांना एकत्रित आणणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे.