'बर्ड फ्लू' बाबत आरोग्य मंत्रालयाने दिली 'ही' महत्त्वाची माहिती
'बर्ड फ्लू' बाबत आरोग्य मंत्रालयाने दिली 'ही' महत्त्वाची माहिती
img
दैनिक भ्रमर
जगामध्ये बर्ड फ्लूचा (bird flu) धोका वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताच्या आरोग्य मंत्रालयाने महत्त्वाची माहिती देत म्हटलंय की, ते परिस्थितीवर बारिक लक्ष ठेवून आहेत. लहान मुलं आणि वयस्कर व्यक्तींना हंगामी इन्फ्लूएंझाची लागण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभाग या दोन गटाकडे विशेष लक्ष देत आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय की, हंगामी इन्फ्लूएंझा आणि बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. H1N1 रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दूधामध्ये आढलला विषाणू?

झारखंडसह इतर काही राज्यात बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव वाढल्याची शक्यता आहे. रांचीमध्ये प्रादेशिक पोल्ट्री फार्मचे दोन डॉक्टर आणि सहा कर्मचाऱ्यांना विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. खबरदारी म्हणून १७४५ कोंबडी, ४५० बदकं आणि १६९७ अंडी यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. केरळमध्ये अशाप्रकारची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. रोगजनक एशियन एव्हिएन इन्फ्लूएंझा जो H5N1 विषाणूमुळे होतो. प्रामुख्याने पक्षांना संक्रमित करतो, पण तो माणसांमध्ये देखील पसरु शकतो. पक्षांसोबत जवळचा संपर्क आणि दूषित वातावरणात राहिल्याने याचा प्रसार होतो. आरोग्य मंत्रालयानुसार, अमेरिकेमध्ये एव्हिएन इन्फ्लूएंझा विषाणू गाईगुरे आणि दूधामध्ये आढळून आला आहे.

मार्गदर्शक सूचना जारी

विषाणूचा प्रसार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे होतो असं आतापर्यंत तरी आढळून आलं नाही, पण संशोधनात अनेक गोष्टी समोर आलेल्या नाहीत. गाईगुरांचे दूध पिल्याने H5N1 विषाणूची लागण होते का? याबाबत संसोधन सुरु आहे. मात्र, लोकांनी फक्त पाश्चराइज्ड दूध प्यावे असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. दूध चांगले उकळणे आणि मांस चांगले शिजवणे यामुळे विषाणूचा माणसांकडे होणारा प्रसार रोखता येईल.
हंगामी इन्फ्लूएंझा (Seasonal Flu) हा तीव्र श्वसन संक्रमण आहे जो इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होतो. इन्फ्लूएंझा किंवा H5N1 चा पहिला रुग्ण २००९ मध्ये आढळून आला होता. भारतामध्ये दरवर्षी दोनवेळा हंगामी इन्फ्लूएंझाचा प्रादूर्भाव वाढतो. जानेवारी ते मार्च महिन्यात आणि मान्सूननंतर हा विषाणू हातपाय पसरतो. आरोग्य मंत्रालयानुसार, सध्या इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढलाय अशी स्थिती किमान भारतात तरी नाही. यासंदर्भात मार्गदर्शन सूचना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group