पोल्ट्री व्यावसायीकांकडून महाराष्ट्र व केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन;  कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
पोल्ट्री व्यावसायीकांकडून महाराष्ट्र व केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
img
Dipali Ghadwaje
पिंपळगाव नजीक ग्रामपंचायत हद्दीतील पोल्ट्री मालक व चालक सर्रास उघडयावर मेलेल्या कोंबडया शेतात व रोडलगत टाकून देत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करत आहेत व त्यामुळे भटके तसेच  पिसाळलेल्या कुत्र्यांची वाढ होऊन ते हिंसक होत असल्याने ते शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांवर हल्ले करत आहेत व शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. 

दरम्यान मागील ६ महिन्यात १५-२० नागरिकांवर कुत्र्यांची हल्ले झालेले आहेत तसेच यापूर्वी १ विध्यार्ध्याचा रेबीज आजाराने मृत्यू झालेला आहेत,तसेच काही पोल्ट्री मालकाने भटक्या  कुत्र्यावर विषप्रयोग केल्याने १०-१५ कत्रे आजूबाजूच्या परिसरात मरण पाऊण दुर्गंधी निर्माण झाली होती, त्यामुळे शेतकरी तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहेत.

पोल्ट्री मालकांना स्थानिक नागरिक व शेतकरी यांनी समाज देऊन ही सदर घटना घडत आहेत. सदर तक्रार ग्रामपंचायत, आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ, जिल्हा अधिकारी  याना देऊन हि अद्याप  कोणतीही निर्णायक कारवाई करण्यात आलेली नाहीत .
 
त्यातील बहुतांश पोल्ट्री फार्मच्या ग्रामपंचायत कार्यालयात नोंदी नाहीत व मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत कराची चोरी होत आहेत, सदरची सविस्तर चौकशीची विनंती ग्रामपंचायत व वरिष्ठ अधकाऱ्यांकडून केले आहेत, मात्र अद्याप पर्यंत कोणताही प्रतिसाद आलेला नाहीत.

त्यामुळे या प्रकरणी कुठलीही ठोस कारवाई न झाल्यास उपोषण अथवा आंदोलन करण्याचा इशारा मधुकर सरोदे, कैलास खुटे, रमेश खोडके, धनंजय वाघचौरे, दीपक खुटे, व इतर ११० कुटुंब प्रमुख  व स्थानिक रहिवाशी  शेतकऱ्यांनी दिलेला आहेत .

इतर बातम्या
Join Whatsapp Group