पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल उद्या लागणार असून दाभोलकर कुटुंबियांना तब्बल १० वर्षांनी न्याय मिळणार आहे.
या खटल्यात ५ आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आले असून उद्या हत्येच्या खटल्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या ५ जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.
दरम्यान या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती.