धुळे लोकसभा मतदार संघातून काँग्रेस तर्फे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
आज डॉ. तुषार शेवाळे यांनी धुळे येथे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला असून त्यांच्या भाजपामधील प्रवेशाने मालेगाव काँग्रेसला खिंडार पडले आहे.
डॉ. शेवाळे हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण, पक्षाने डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज झाले. त्यानंतर काँग्रेसने नाराजी दूर करुन राज्यस्तरावरील पदही दिले. त्यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.