गुगल क्रोम हा आपल्या रोजच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. गुगलने त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवनवीन सर्व्हिस लाँच केल्या आहेत. गुगल मॅप, गुगल पे यासारख्या अनेक सर्व्हिस आज आपण वापरतो. पण लवकरच गुगल एक सर्व्हिस बंद करणार आहेत.
गुगलने लाँच केलेली वीपीएन सर्व्हिस Google One VPN Service लवकरच बंद करण्यात येणार आहे. जवळपास 4 वर्षांपूर्वी ही सर्व्हिस लाँच करण्यात आली होती. मात्र, आता कंपनीने अधिकृतरित्या बंद करण्याची घोषणा केली आहे.
का बंद होणार व्हिपीएन सर्व्हिस?
गुगल वन वीपीएन सर्व्हिस 20 जून 2024 साली बंद करणार आहे. गुगलने ऑक्टोबर 2020मध्ये ही सर्व्हिस लाँच केली होती. गुगल सपोर्ट पेजने दिलेल्या माहितीनुसार, 20 जून 2024पासून गुगल वन वीपीएन सर्व्हिस बंद करण्यात येणार आहे. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, पिक्सल 8 आणि नवीन ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या डिव्हाइसमध्ये इन बिल्ड वीपीएन सिस्टिम देण्यात येत होती. अशातच गुगलकडून अन्य एका वेगळ्या वीपीएन सर्व्हिसवर पैसे खर्च करण्याचा कोणताही विचार नाहीये. त्यामुळं आता VPN सर्व्हिस बंद करण्यात येत आहे.
या जुन्या फोनमध्ये मिळणार अपडेट
गुगलच्या जुन्या गुगल पिक्सेल 7, गुगल पिक्सेल 7 प्रो आणि गुगल पिक्सल 7 A आणि फोल्ड डिव्हाइसच्या इन बिल्ट वीपीएन अपडेट जारी करण्यात येणार आहे. म्हणजेच तुमच्या जुन्या फोनमध्ये अजूनबी इन-बिल्ड गुगल सर्व्हिस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन डिव्हाइसमध्ये आधीपासून म्हणजेच इनबिल्ट वीपीएन सर्व्हिस ऑफर करण्यात येणार आहे.
काय आहे व्हीपीएन सर्व्हिस?
VPN एक व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क आहे. हे एन्क्रिप्टेड मोडवर तुम्हाला सुरक्षित ब्राउजिंगचा पर्याय देते. ते इंटरनेट प्रोव्हायडर आणि तुमच्या नेटवर्कमध्ये एन्क्रिप्टेड कोड तयार करते. ज्यामुळं तुम्ही कोणत्या वेबसाइटला व्हिजिट केलं आहे हे अजिबात कळणार नाही. त्याचबरोबर मोबाइलवर तुम्ही कोणतं ॲप वापरता हेदेखील कळणार नाही.