मानवी दुधाच्या व्यापारात गेल्या काही दिवसांपासून तेजी आलेली आहे. भारतात आईच्या दुधाची विक्री करणे बेकायदेशीर आहे. परंतु छुप्या पद्धतीने मानवी दुधाची विक्री होत असल्याचे समोर येत आहे. अशा प्रकारांना त्वरीत आळा घालण्याच्या सूचना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने दिल्या आहेत.
दरम्यान नियंत्रकांनी सर्व राज्याच्या आणि केंद्र शासित प्रदेशातील अन्न सुरक्षा आयुक्तांना या सूचनांची कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांरव कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
FSSAI ने मानवी दूध विक्री, त्यावर कोणतीही प्रक्रिया न करण्याचे निर्देश दिले आहेत. दूध विक्री करणाऱ्या अशा काही व्यापाऱ्यांना त्यांनी कडक करावाईचा इशारा दिला आहे. याविषयीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हे आदेश देण्यात आले.
काही व्यापारी आईच्या दुधाची विक्री करण्याला FSSAI ने मान्यता दिल्याची थाप मारत असल्याचे समोर आले होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने 24 मे रोजी हा नवीन आदेश दिला आहे. अन्न नियत्रंक विभागाला देशभरातून या संबंधीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अनेक सरकारी संस्थांनी पण याविषयीची माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे त्यासाठी FSSAI ची मान्यता असल्याची बतावणी केली जात आहे. त्यामुळे FSSAI ने कडक पाऊल टाकलं आहे. अन्न सुरक्षा कायदा 2006 आणि नियमांतर्गत मानवी दूधाची विक्री आणि प्रक्रियेला मान्यता देण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य-केंद्र शासित प्रदेशांन सूचना
राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांतील अन्न सुरक्षा आयुक्तांनी केंद्रीय संस्थेने अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. मानवी दुधाची विक्री होत असल्याचे समजल्यास तात्काळ संबंधितांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मानवी दूध आणि त्यावरील प्रक्रिया केलेले इतर पदार्थ यांची विक्री करण्यास सक्त मनाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंबंधीच्या अन्न सुरक्षा अधिनियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कायद्यातंर्गत कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा अधिनियमातंर्गत परवानाधारक एखादी संस्था, व्यक्ती, आईचे दूध विक्री करण्याच्या व्यवसायात असल्याचे लक्षात आल्यास त्याचा परवाना रद्द करण्याची आणि त्याला पुन्हा तो परवाना न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.