सिनेसृष्टीवर शोककळा! ईनाडू आणि रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन
सिनेसृष्टीवर शोककळा! ईनाडू आणि रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन
img
Dipali Ghadwaje
ईनाडू वृत्तपत्र आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं आज पहाटे निधन झालं. हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पहाटे ३.४५ ला त्यांची प्राणज्योत मालवली. रामोजी राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांना हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात ५ जून रोजी दाखल करण्यात आलं होतं. आज ते काळाच्या पडद्याआड गेले आहे. 

रामोजी राव यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा

१६ नोव्हेंबर १९३६ या दिवशी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावातल्या एका शेतकरी कुटुंबात रामोजी राव यांचा जन्म झाला. रामोजी राव यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली. मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजी राव यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. रामोजी राव यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातो आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group