काय सांगता....! 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये एण्ट्री केलेली 'वडापाव गर्ल' दिवसाला करते 'इतकी' कमाई
काय सांगता....! 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये एण्ट्री केलेली 'वडापाव गर्ल' दिवसाला करते 'इतकी' कमाई
img
Dipali Ghadwaje
नुकतच 'बिग बॉस ओटीटी 3' सुरु झालंय. 'बिग बॉस ओटीटी 3' च्या घरात तब्बल १६ स्पर्धकांची एन्ट्री झाली. एकापेक्षा एक वेगळ्या स्वभावाच्या स्पर्धकांची एन्ट्री 'बिग बॉस ओटीटी 3' च्या घरात झालीय. 'बिग बॉस ओटीटी 3' मधील सर्वात चर्चेत असलेली स्पर्धक म्हणजे दिल्लीची व्हायरल वडापाव गर्ल अर्थात चंद्रिका दीक्षित. चंद्रिकाने 'बिग बॉस ओटीटी 3'च्या घरात आल्यावर ती दिवसाला किती रुपये कमावते याचा खुलासा केलाय.

दिल्लीची व्हायरल वडापाव गर्ल अशी ओळख असलेली चंद्रिका दीक्षित काल 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये सहभागी झाली. 'बिग बॉसच्या  घरात आल्यावर यावेळी तिने घरच्यांशी बोलताना ती दिवसाला किती रुपये कमावते याचा उल्लेख केला.

चंद्रिका म्हणाली, "मी दिवसाला ४० हजार कमावते. वडापाव विकून माझी इतकी कमाई होते, याशिवाय लोक मी घेतलेल्या गाडीवर, मोबाईलवर, घरावर टीका करतात. जर मी चांगले पैसे कमवत असेल तर ते कसे खर्च करायचे याचा मला हक्क आहे. जर माझी कमाई चांगली असेल तर त्यातून स्वतःसाठी चांगल्या वस्तू मी नक्कीच घेऊ शकते." चंद्रिकाची कमाई ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

वडापाव गर्ल बिग बॉसच्या घरात

'वडापाव गर्ल' अशी ओळख असलेली चंद्रिका आधी पूर्णवेळ नोकरी करायची. पण जेव्हा कोविडच्या काळात तिच्या मुलाची तब्येत बिघडली तेव्हा चंद्रिका आणि तिचा पती यश गेरा यांना नोकरी सोडावी लागली. दोघांनीही आपल्या मुलाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघांनी दिल्लीत वडापावचा स्टॉल लावला आणि काही वेळातच त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. मुंबई स्टाईलमध्ये वडापाव विकण्याची चंद्रिका आणि तिच्या नवऱ्याची कल्पना एकदम शानदार असल्याने लोकांची गर्दी होऊ लागली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group