'या' राज्यात महागलं दुध! लिटरमागे दोन रुपयांची वाढ
'या' राज्यात महागलं दुध! लिटरमागे दोन रुपयांची वाढ
img
Jayshri Rajesh
एका बाजूला दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजुला विविध दुध संस्था आपल्या दुधाच्या दरात वाढ करताना दिसत आहे. सर्वसामान्यांना आता दुधाने आणखी एक झटका दिला आहे. कर्नाटकमध्ये दुधाच्या दरात वाढ झाली आहे. कर्नाटक दूध महासंघाने नंदिनी दुधाच्या दरात  लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. दरम्यान, दरात वाढ जरी केली असली तरी प्रत्येक पॅकेटमध्ये 50 मिली अतिरिक्त दुध मिळणार आहे. या वाढीनंतर 1050 मिलीसाठी दुधाची किंमत  प्रति लिटर 44 रुपये होईल. जे नंदिनी मिल्कच्या सर्व दुधाच्या प्रकारांमध्ये सर्वात स्वस्त आहे.

 दरात दुसऱ्यांदा वाढ

 26 जूनपासून या सुधारित किमतीसह, कर्नाटक दूध महासंघाने प्रत्येक पॅकेटमध्ये 50 मिमी अतिरिक्त दूध देण्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे, एक लिटर दुधाच्या पाकिटात 1050 मिली दूध आणि अर्ध्या लिटर दुधाच्या पाकिटात 550 मिली दूध मिळणार आहे. एका वर्षाच्या आत कर्नाटकातील दुधाची ही दुसरी दरवाढ आहे. गेल्या वर्षी जुलै 2023 मध्ये कर्नाटक मिल्क फेडरेशनने दुधाच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ केली होती.

अमूल परागसह मदर डेअरीनेही केली वाढ

एका बाजूला दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजुला विविध दुध संस्था आपल्या दुधाच्या दरात वाढ करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच अमूल आणि मदर डेअरीसह आता परागने दुधाच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळं पगार दुधाची किंमत प्रतिलिटर 66 रुपयांवरुन 68 रुपयांवर गेली आहे. महागाईचा परिणाम आता दुधावरही दिसून येत आहे. दुधाचे नवीन दर आज रात्रीपासून लागू होणार आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group