मोठी बातमी ! टीम इंडियाच्या खेळाडूंचा विधानभवनात होणार भव्य सत्कार; ‘या’ चार खेळाडूंचा विशेष सन्मान
मोठी बातमी ! टीम इंडियाच्या खेळाडूंचा विधानभवनात होणार भव्य सत्कार; ‘या’ चार खेळाडूंचा विशेष सन्मान
img
Dipali Ghadwaje
टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आहे. टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशात परतली आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर टीम इंडिया आज मुंबईत येणार आहे. मुंबईत टीम इंडियाची भव्य व्हिक्ट्री परेड निघणार आहे. त्यामुळे आपल्या जगज्जेत्या खेळांडूचा भव्य सत्कार करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. याशिवाय उद्या टीम इंडियाच्या खेळाडूंचा विधानभवनातही सत्कार होणार आहे. यावेळी मुंबईकर खेळाडूंचा विशेष सन्मान केला जाणार आहे.

टीम इंडीयातील 4 खेळाडू मुंबईकर आहेत. हे चारही जण महाराष्ट्रातील आहेत. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचा उद्या सत्कार करण्यात येणार आहे. विधीमंडळ आवारात टीम इंडियातील खेळाडू येणार आहेत. त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे.  

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

टीम इंडीयातील 4 खेळाडू मुंबईकर आहेत हे चार खेळाडू उद्या विधान भवनात येतील. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. 

 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group